Wednesday 31 August 2016

सोयाबिन लागवड पध्दती

                

सोयाबिन लागवड पध्दती

  
         

                     सोयाबीन ची लागवड करतांना तापमान आणि सुर्यप्रकाश किती तास राहील याचा विचार करावा. सोयाबीन हे शॉर्ट डे (म्हणजेच दिवसांत कमी तास सुर्यप्रकाश राहणे) पिक आहे. सोयाबीन ला जसा जसा दिवसांतील सुर्यप्रकाशाचा कालावधी कमी कमी होत जाईल तसे तसे फुल धारणा होत असते. सोयाबीनची लागवड ४.५ ते ८.५ च्या पीएच (सामु) असलेल्या जमिनीत केली तरी चालते. ज्या जमिनीत जास्त प्रमाणात पाणी साचुन राहत असेल त्या जमिनीत सोयबीन ची लागवड करु नये.



लागवडीपुर्वी बीज प्रक्रिया



  • सोयाबीन च्या लागवडी पुर्वी रायझोबियम आणि सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरीया ची बीज प्रक्रिया करावी.
  • सोयाबीन पिकाच्या मुळांवरती रायझोबियम ही सहजीवी नत्र स्थिर करणारा बॅक्टेरिया (जीवाणू) गाठी करुन राहत असतो.
  • हा बॅक्टेरिया हवेतील मुक्त स्वरुपातील नत्र, सोयाबीन पिकांस उपल्बध होईल अशा स्वरुपात रुपांतरीत करीत असतो.
  • रायझोबियम च्या वापराने सोयबीन ची चांगली वाढ होते. फांद्यांची संख्या वाढते, तसेच जास्त प्रमाणात प्रोटिन्स तयार होवुन दाण्यांचे वजन देखिल वाढते.
  • सोयाबीन पिकापासुन २० टक्के इतके तेल मिळते. सोयाबीनच्या दाण्यांत २० टक्के तेल तयार होण्यात सल्फर (गंधक) हे अन्नद्रव्य फार महत्वाची भुमिका बजावित असते.

लागवड


     सोयाबीन ची लागवड जुन ते जुलै महिन्यात केली जाते.
लागवड करतांना पावसाचा अंदाज घेवुन लागवड करावी. पेरणीनंतर जास्त काळ राहणारा कोरडा काळ सोयाबीन पिकासाठी हानीकारक ठरतो. अशा कोरड्या काळामध्ये रोपांची मर होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मान्सुन व्यवस्थित स्थिर झाल्यानंतरच पेरणी करावी.
  • सोयाबीन ची पेरणी करतांना १ एकरात १,७७,७७७ रोप बसतील अशा पद्धतीने पेरणी करावी.
  • पेरणीतील अंतर हे दोन ओळीत ७५ से.मी. आणि दोन रोपांत १० .सें.मी. राहील असे करावे. एका ठिकाणी २ किंवा ३ बिया टोचता येतात.
  • पेरणी करतांना जमिनीत फार खोलवर पेरणी करु नये, त्यामुळे सोयाबीन ची वाढ हवी तशी मिळत नाही.
  • १ एकरात पेरणीसाठी ३० ते ४० किलो बियाणे पुरेसे होते.

तणनियंत्रण


शेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.
सोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके, हि तणनाशके वापरतांना कंपनी प्रतिनाधी, कृषी तज्ञ, किंवा दुकानदार यांचा सल्ला घेवुन, रोपांवर फवारणी होणार नाही याची काळजी घेवुन वापरावे.
तणनाशककेव्हा वापरावे
पॅराक्वेट आणि पेंडीमेथिलिनलागवडीनंतर २ दिवसांच्या आत वापारवे.
पॅराक्वेट आणि ब्युटॅक्लोरलागवडीनंतर २ दिवसांत वापरावे.
फुसिलेड फोर्टीलागवडीनंतर २१ ते २८ दिवसांनी वापरावे.
तण उगवणीनंतर वापरण्याचे तणनाशक -
टरगाबहुवार्षिक तणांच्या नियंत्रणासाठी दोन वेळेस वापारवे लागु शकते.
परस्युट (इमिझाथायपर)तण उगवणीनंतर वापरता येते. तणाच्या वाढीचा काळ सक्रिय हवा.

अन्नद्रव्य व्यवस्थापन -(प्रमाण किलो प्रती एकर)

सोयाबीन पिकाच्या मुळांवरती रोयझोबियम हा उपयुक्त जीवाणू राहत असल्याने या पिकांस वरुन नत्र खताची फारशी गरज भासत नाही.
सोयाबीनच्या मुळांवरील गाठी निट तयार होण्यासाठी पेरणी सोबत किंवा रोप उगवल्यानंतर लागलीच १० किलो फेरस सल्फेट १ एकरात जमिनीतुन द्यावे.
या शिवाय सोयाबीन पिकांस खालिल प्रमाणे अ्नद्रव्ये द्यावीत.
लागवडीनंतर दिवसनत्रस्फुरदपालाशमॅग्नेशियम सल्फेटकॅल्शियम नायट्रेटसल्फरझिंक सल्फेटफेरस सल्फेटमँगनिज सल्फेट
५-१० दिवस१०२५२५००००००००१०००
३०-३५ दिवस००००००१०००००१०००
एकुण१०२५२५१०००००१०००
सोयाबीन पिकांत शेंगा पोसत असतांना सल्फर (गंधक) युक्त खतांचा वापर करावा. मात्र या कतातुन पिकांस उपलब्ध होईल अशा स्वरुपात गंधक मिळविण्यासाठी सल्फर ऑक्झिडाझिंग बॅक्टेरियाचा वापर करणे गरजेचे आहे. या काळात पिकांस बोरॉन आणि पालाश ची गरज फवारणीतुन पुर्ण करावी.
पिकाच्या वाढीची अवस्थाफवारणीच्या खतांचा प्रकारप्रमाण प्रती लिटर पाणी
लागवडीनंतर १० - १५ दिवसांत19-19-192.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये2.5-3ग्रॅम
वरिल फवारणीनंतर १५ दिवसांनी२० टक्के बोरॉन1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये2.5-3 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत00-52-344-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)2.5-3 ग्रॅम
शेंगा पासत असतांना00-52-344-5 ग्रॅम
बोरॉन1 ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ७ दिवसांनी00-52-344-5 ग्रॅम